Join WhatsApp group

Ads

राष्ट्रवादी श. प. गटाचे एक उमेदवार तिसऱ्या आघाडीसाठी सज्ज हालचालीना वेग

By Sarkarmzanews

October 22, 2024 11:14 am

Ads

प्रेमराज शर्मा – २२ ऑक्टो २४ मूर्तिजापूर- मूर्तिजापूर बार्शीटाकली मतदारसंघ 32 मध्ये आज दुपारपर्यंत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यांचे उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या रेस मध्ये 16 जण असून त्यामध्ये तीन ते चार उमेदवार हे फायनल लिस्ट मध्ये होते पण एक उमेदवारला या मधून सरळ डावलण्यात आले हे जग जाहीर झाल्यामुळे सध्या आशेच्या भरोशावर ते उमेदवार मुंबई येथे ठिय्या मांडून बसलेले आहे. तरी मुर्तीजापुर मध्ये आत मधून तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याची त्यांची तयारी दिसत आहे.

त्यांचे विश्वासू व कार्यकर्ते हे सध्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात आहे काल रात्री मूर्तिजापूरच्या बायपास एका धाब्यावर यांची या विषयावर तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांसोबत मीटिंग सुद्धा झाली आहे.

तसेच तिसरा आघाडीच्या प्रवेशासाठी हालचालींना जास्त वेग आल्याचे दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!