Join WhatsApp group

Ads

उमेदवारी साठी शक्ती प्रदर्शन – मुंबईत पैशांचा पाऊस पाळून ‘ता-ता-थैया’

By Sarkarmzanews

October 19, 2024 11:29 am

Ads

प्रेमराज शर्मा – १९ ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर – पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी या साठी भावी उमेदवाराने मुर्तीजापुर येथुन काही युवक कार्यकर्त्ते व पदाधिकारी वर्गा यांचा सोबत थेट मुंबई गाठली असून पक्ष कार्यलया मध्ये ठिय्या मांडून बसले आहे, रोज रेल्वे तिकीट एजंटच्या मार्फत तिकीट बनवून उर्वरित विश्वासू कार्यकरते मुंबईला बोलविल्या जात आहे.

दिवसभर आपल्या भेटीगाठी घेऊन पक्षातल्या वरिष्ट नेते मंडळीला केलेल्या कार्याची रोज एकच फाईल दाखवण्याचे कार्यक्रम सुरु आहे. उमेदवाराचा मागे शेकडो कार्यकर्ते पक्ष कार्यालया मध्ये उपस्थित असतात दिवसभर हा कार्यक्रम आटपून संध्याकाळी कार्यकर्त्यांना मोठ्या बार मध्ये जेवण व दारू ची सोय केली जात आहे.

मग जिल्ह्यातील व तालुक्यातील विशिष्ट पदाधिकारी वर्गाला V.I.P. सुविधा उपलब्ध करण्यात येत . विशिष्ट पदाधिकारी वर्गाला डान्स बार मध्ये नेण्यात येते व लाखो रुपये दररोज डान्स बार मधल्या नर्तकीवर उडवायला दिले जातात तसेच मग उर्वरित रात्रीस खेळ चालते . अशे काही आखोदेखा हाल विश्सवसनीय सूत्रांन द्वारे सरकार माझा न्यूजला माहित पडले आहे.

दारूच्या नशेत काही तर पदाधीकार्यांनी तर उमेदवारीशी आमचे काहीच घेणे देणे नसून फक्त आम्ही अय्याशी साठी येथे आलो आहे असे त्यांनी सांगितले.

उमेदवारी साठी पिसाटलेले अशे भावी आमदार लोकशाहीला अजून किती खालचा पातळी वर घेऊन जातील व कदाचित जर असे उमेदवार निवडून आले तर हे खरच जनतेला त्यांचा हक्काचा न्याय मिळवून देतील का ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!