Join WhatsApp group

Ads

उमेदवारी पक्की करण्यासाठी पवार साहेब यांचा मागे पुढे चकरा?

By Sarkarmzanews

October 17, 2024 1:01 pm

Ads

प्रेमराज शर्मा – १७ ऑक्टों. २४ – येणाऱ्या विधानसभे निवडणुकी साठी जर सगळयात जास्त कुठल्या पक्षात उमेदवार घोषित होण्यासाठीची चुरस विरोधी पक्ष असो की श. प. गट किंवा मतदार संघाची जनता सगळ्याचे लक्ष एकच घोष्टि कडे लागले आहे ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याचा उमेदवार कोण ?

जर कदाचित तो उमेदवार घोषित झाला की निवडणूक पूर्ण होण्या आधीच जनता सांगून देणार की कोणता पक्ष निवडून येणार ? राष्ट्रवादीने आज पर्यंत पॅराशूट उमेदवाराला पण मैदानात उतरविले व स्थानिक उमेदवाराला पण हाथी लागले फक्त पराजय होण्याचे श्रेय.

सगळे फंडे आजमविल्या नंतर या वेळेस निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती काय? जेव्हा पर्यंत उमेदवार घोषित होत नाही तो पर्यंत काही समजू शकत नाही.उमेदवार घालताय साहेबाच्या मागे पुढे चकरा.१५ ते १६ इच्छुक उमेदवारातून रेस मध्ये फक्त ३ नाव चर्चेत आहे विश्वासू सूत्राच्या आधारे पण पॅराशूट सोडून दोनच उमेदवारांन वर पक्ष विचार करीत आहे.

पण सध्या तिन्ही उमेदवाराने मुंबई बारामती पुणे जिथे जिथे पवार साहेब जात आहे, तिथे तिथे आपली गाडी त्यांचा मागेच फिरवत आहे मुंबई मध्ये काही कार्यकर्ते जयंतराव यांचा कडून सकाळी साहेबाची अपॉइंटमेंट घेतात तर इकडे साहेबाच्या बंगल्या समोर इच्छुक उमेदवार उभेच असतात त्वरित भेट घेण्याचे कार्यक्रम दररोज सुरू आहे.

साहेबा सोबत भेटीगाठीचे फोटो सोशल मीडियाचा माध्यमातून मतदार संघात फिरवत आहे. कार्यकर्त्याना न खचून जाण्याचा अप्रत्याक्ष संदेश देत आहे.पेड न्युज व सोशल मीडियाचा माध्यमातून त्यांचे असे म्हणणे दिसत आहे की धैर्य ठेवा इकडे माझी फिल्डींग ओके आहे.

सध्या असा चित्र मुर्तिजापूर बार्शीटाकली मतदार संघात दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!