Join Whatsapp

परत कथित समाज सेवकाने शासनाच्या पेट्यांनवर ओढल्या आयत्या रेगोट्या !

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – १४ ऑक्टोबर २४ मुर्तीजापुर – महाराष्ट्र शासनाचा वतीने कामगार कल्याण योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते.
इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते.

तेथे स्थलांतरीत व्हावे लागते,अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 10 लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण महाराष्ट्र शासन महाराष्ट्र भर वितरीत करत आहे.

तसेच काही भावी उमेदवार (कथित समाज सेवक) व विशिष्ट पक्षाचा नेते मंडळीनीं आज परत शासनाच्या पेट्यांनवर आयत्या रेगोट्या ओढण्याचा प्रयंत्न करून महाराष्ट्र शासनाचा योजनेचे श्रेय लाटण्याचा काम मुर्तीजापुर शहरात केलाच्ये दिसून आले.

जणू यांचाच प्रयान्तांतून ह्या पेट्या आल्या, शासनाचे ट्रक आल्यावर हे बहादूर मंडळी ने त्यां पेट्या लोकांना वाटल्या व भाषणबाजी करत नेतागिरी केली, व प्रसार माध्यमांना तेथे बोलावून आपली वा वाही करत लोकांना परत वेठीस धरले .

या आधी पण सरकार माझा न्यूज ने यांचे ढोंगीपणा आपल्या बातमीतून या भावी उमेदवार (कथित समाज सेवक) यांचे अनेक किस्से उघडकीस आणले आहे, असे अनेक किस्से या भावी उमेदवार कथित समाज सेवकाचे शहरात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!