Join WhatsApp group

वंचित मधून खरंच कथित समाजसेवकाची उमेदवारी पक्की का?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तिजापूर -१४ ऑक्टोबर २४ – विधानसभा निवडणुक जवळ आली असुन प्रत्येक पक्षा मध्ये भावी उमेदवार आप आपल्या पद्धतीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

कोणी आपल्या जातीची मत मोजून पक्षाला आपली ताकद दाखवतो तर कोणी समाजसेवा करून तर कोणी पैश्याचा भरवश्यावर. कोणी सामाजिक संस्थेच्या नावावर लोकांना मूर्ख बनवुन.

काही कथित समाजसेवक वर्षभरा पासुन निव्वळ पैशाचा जोरावर वंचित मध्ये तिकीट मिळवण्याची दावेदारी करत आहे.

तर काही उमेदवार मागील निवडणूक मध्ये मला किती मत मिळाले या गणिताचा आधारे दावा करीत आहे.

खोट्या समजसेवेचा वाजगाजा करून काही पैशाचा भरवश्यावर मोठ मोठे कार्यक्रम गाजवून जनतेला वेठीस धरून.

तसेच काही कार्यकर्त्यांना रोज पैशे, दारू व जेवण देऊन दादालाच तिकीट फायनल झाला आहे असे संभ्रम रोज पोपट कार्यकर्ते निर्माण करत आहे.

खरंच कथित समाजसेवक यांना तिकीट मिळाला आहे का? की फक्त हे आपली हवा गरम करण्यासाठी पक्षाचा कार्यकर्त्यांना व जनतेला मूर्ख बनवत आहे हे पाहणे सध्या गरजेचे झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!