Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर विधानसभा सभा मतदार संघ ३२ मध्ये महाविकास आघाडीत विरोधी सुर

By Sarkarmzanews

October 13, 2024 7:18 pm

Ads

प्रेमराज शर्मा – १३ ऑक्टोबर २४ – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुर्तीजापुर विधानसभा सभा मतदार संघ ३२ मध्ये तिकीट एक विशिष्ठ व्यक्तीला भेटण्याची ९९% शक्यता असल्याचे सूत्रान कडून माहिती होत आहे.

त्यासाठी आज १३ ऑक्टोबर २४ रोजी मुर्तीजापुर विधानसभा सभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे पधाधिकारी आज जिल्ह्यातील काही ठराविक नेत्यांना भेटण्यासाठी अकोला येथे गेले असून त्या मध्ये कॉंग्रेस आय चे काही पधाधिकारी राष्ट्रवादी श.प. गटाचे पधाधिकारी तसेच शिवसेना ऊ.बा.ठा. गटाचे पधाधिकारी असून जिल्ह्यातील काही ठराविक नेत्यांना भेटले.

वरिष्ठ नेत्यांना या पधाधिकार्यांचा रोषाला समोरे जावे लागले, होऊन गेलेल्या लोकसभेच्या कठीण काळात जे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्या साठी झटले व ज्यांनी युती धर्माचा पालन केले. आम्ही त्यांचाच साठी झटू व त्यांचेच काम करू असे एक सुराने प्रत्येक गटाचा पधाधिकारीने असे आपले मत मांडले. येणाऱ्या निवडणुकीत आता महाविकास आघाडीत मुर्तीजापुर विधानसभा सभा मतदार संघ ३२ मध्ये पक्षाअंतर्गत विरोधाचे सुर उठणार का ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!