Join WhatsApp group

Ads

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत १० ऑक्टोबर रोजी सुनावणी

By Sarkarmzanews

October 8, 2024 7:06 pm

Ads

अमर तळोकर मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत गुरुवार, दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्रशासकीय इमारत (डेअरी विभाग), पहिला मजला, अब्दुल गफारखान मार्ग, वरळी सी फेस, मुंबई येथे सुनावणी होणार आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांच्या तक्रारींवर आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडे सुनावणी होणार आहे. संबंधित अर्जदार व संबंधित शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या बाबतीत तक्रारींच्या अनुषंगाने सुनावण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी कळविले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!