Join WhatsApp group

Ads

सम्राट सुरवाडे पण आता मैदानात विधानसभा -३२

By Sarkarmzanews

October 8, 2024 12:03 am

Ads

न्यूझ डेस्क – सध्या जिकडे तिकडे राजकीय क्षेत्रात निवडणुकीची धूम सुरू आहे.

मुर्तिजापूर बार्शीटाकळी मतदार संघ 32 मध्ये आणखी एका दमदार उमेदवाराने आपला दावा ठोकून आपले तळ मूर्तिजापूर येथे मांडून आपली आमदारकीची तयारी घोषित केली असून आणखी एक भावी आमदारकीचे बीजारोपण केले आहे त्यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मूळ अकोला शहरात वास्तव्य करून आज पर्यंत जन्म भुमी अकोला असून आता मतदार संघ 32 हे आपली कर्म भुमी बनविण्याचे ठरविले आहे.

निवडणुकीची संधी साधून त्यांनी हे निर्णय घेतले आहे खूप वर्ष सामाजिक कार्य अकोला जिल्ह्यात केल्या नंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मतदार संघ 32 हे अनुसूचितजाती साठी राखीव असून आज पर्यंत या मतदार संघात कोणतेही खरे अनुसूचित जाती मधले आमदार येथून निवडून न आल्याने त्यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे धाडस केले आहे.

राजकारणी भाषेत वंचित व मागासवर्गीय समाजाला खरच या मतदार संघात न्याय मिळवा या साठी त्यांचे हे प्रयत्न आहे.

मी एक खेळाडू असून खेळाडूवृत्तीचा माणूस आहे जिंकणे व पराजित होणे हे माझ्यासाठी काही उद्देशाचे नसून राजकारणातून समाजकारण कसं करता येईल याकडे माझे सर्वात जास्त लक्ष आहे . पण जर जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला तर मी नक्कीच एक लोकप्रतिनिधी न म्हणून त्यांचा शुभचिंतक म्हणून काम करेल.

असे त्यांनी सरकार माझा न्युज ला बोलताना सांगितले

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!