Join WhatsApp group

Ads

ठाणेदार गुट्टे साहेबांची पुढची कारवाई निंबा कडे? गावात तीन महाराजांचा अंधश्रद्धेचा कहर

By Sarkar Maza

April 17, 2026 9:55 am

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील शिवण येथे भोंदू बाबाला सरकार माझा न्यूजने दणका दिल्या नंतर निंबा गावातील लोकांचाही अपेक्षा उंचावल्या आहे. सरकार माझा न्यूज सोबत संपर्क करत गावातील काही बुद्धिजीवी लोकांनी आमचे गाव सुद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडावे असे मत व्यक्त केले आहे.

मुर्तिजापूर तालुक्यातील निंबा हे गाव सध्या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले असल्याचे चित्र समोर येत आहे. गावात दर सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या महाराजांकडून ‘दरबार’ भरवला जातो, जिथे “नागाची सवारी येते”, “अंगात देव येतो” अशा दाव्यांमुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे चित्र दिसत आहे.


स्थानिकांनुसार, गावात चेतन महाराज, संदीप महाराज आणि मधु महाराज यांचे दर सोमवारी दरबार भरवले जात असून, देवाच्या नावावर विविध प्रकारचे विधी आणि कथित उपाय केले जातात. या प्रकारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांकडून केला जात आहे.

संबंधित प्रकारांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
या दरबारांमध्ये विविध प्रकारचे विधी, धागेदोरे, औषधी आणि कथित उपाय दिले जात असून, अनेक भोळ्या-भाबड्या नागरिकांकडून देणगी काही महाराज तालुक्यात स्वरूपात म्हणून पैसे उकळतात जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, या प्रकारांमुळे गावात भीतीचे आणि अंधविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला पडत चालला आहे.


तज्ज्ञांच्या मते, “अंगात येणे” किंवा “नागाची सवारी” हे मानसिक व शारीरिक स्थितींशी संबंधित प्रकार असू शकतात. यामध्ये सुचनेचा प्रभाव (suggestion), भीती, श्रद्धा आणि सामाजिक दबाव यांचा मोठा वाटा असतो. मात्र, याचा गैरफायदा घेत काही लोक स्वतःला ‘महाराज’ म्हणून मिरवत लोकांची फसवणूक करत असल्याचेही वास्तव आहे.


दरम्यान, राज्यात घडलेल्या खरात प्रकरणात नेमके काय परिणाम होऊ शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा प्रकारांना वेळेवर आळा घातला नाही, तर त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात, हे त्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निंबा गावातील या अंधश्रद्धेच्या प्रकारांवर वेळ राहता अंकुश लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून नागरिकांना योग्य दिशादर्शन करणे, ही काळाची गरज बनली आहे.


याच पार्श्वभूमीवर, शिवण येथील भोंदू बाबाची दुकानदारी बंद करण्याची कारवाई ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी यशस्वीपणे केली होती. त्याच धर्तीवर निंबा गावातील या महाराजांच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारांवरही कारवाई करून हे “दुकान” बंद करण्यात यावे आणि गावाला या विळख्यातून बाहेर काढावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


या पार्श्वभूमीवर, मुर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत अशा प्रकारांवर कारवाई होऊ शकते आणि ती शिवण येथे केली गेली सुद्धा आहे.


गावकऱ्यांमध्येही दोन मतप्रवाह दिसून येत आहेत—काहीजण या महाराजांवर अंधविश्वास ठेवत आहेत, तर काहीजण याला उघड फसवणूक म्हणत आहे.

तसेच या महाराजांन द्वारे चालवणाऱ्या संस्थेची शहानिशा करून आर्थिक व्यवहाराची तपासणी करावी अशी मागणी सुद्धा गावकरी करत आहेत.


निंबा गाव अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडणार का?
ठाणेदार श्रीधर गुट्टे आणि प्रशासन या प्रकारावर लगाम लावणार का? की दर सोमवारी भरत राहणार हे ‘नागाच्या सवारी’चे दरबार?

हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!