Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर मध्ये महसूल समाधान शिबिरावर प्रश्नचिन्ह; प्रसार माध्यमांना निमंत्रणच नाही, कार्यक्रम ‘सेटिंग’चा होता का?

By Sarkar Maza

March 14, 2026 3:12 pm

Ads


मुर्तीजापूर : दिनांक १४ : शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – टप्पा १ (जनसंवाद कार्यक्रम)” अंतर्गत आज मुर्तीजापूर तालुक्यातील पुंडलिक नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. ७/१२ उतारा, फेरफार, वारस नोंद, सीमांकन तसेच प्रलंबित अर्ज यांसारख्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी या शिबिरात नागरिकांना दिली जाते.

oplus_0


मात्र आजच्या कार्यक्रमावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी स्थानिक पत्रकार बांधवांना कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाचा जनसंवाद कार्यक्रम असताना प्रसारमाध्यमांनाच दूर ठेवण्यात आल्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


यामुळे स्थानिक पातळीवर आता कडक सवाल उपस्थित केला जात आहे की, हा कार्यक्रम खरोखरच जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी होता की फक्त औपचारिकतेपुरता ‘देखावा’ होता? प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यामागे नेमके कारण काय? तक्रारी आणि अर्ज आधीच ठरवून सर्व काही ‘सेटिंग’नुसार पार पाडण्यात आले का? असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


“शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा उद्देश असताना कार्यक्रम पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित असते.

मात्र प्रसार माध्यमांना निमंत्रण न देणे आणि माहितीपासून दूर ठेवणे ही बाब संशय निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि या कार्यक्रमाबाबत निर्माण झालेल्या शंकांना उत्तर द्यावे, अशी मागणी आता पुढे येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!