Join WhatsApp group

Ads

रुग्णसेवा की अप-डाऊन? मुख्यालयी राहणे कागदावरच? HRA आणि रेल्वे लाईन क्रॉसिंग प्रकरणाने निर्माण केले प्रश्नचिन्ह

By Sarkar Maza

March 14, 2026 1:33 pm

Ads

मुर्तिजापूर: दिनांक १४ : मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यालयी राहणे अपेक्षित असताना काही कर्मचारी बाहेरून अप-डाऊन करत असल्याची चर्चा असून, तरीही घरभाडे भत्ता (HRA) घेतला जातो का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

याच दरम्यान काल मुर्तिजापूर रेल्वे पोलिसांनी रेल्वे लाईन अनधिकृतपणे ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली.

या कारवाईत काही कर्मचारीही पकडले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अप-डाऊन करणारे कर्मचारी वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडतात का? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.शासकीय नियमानुसार, मुख्यालयी राहणे बंधनकारक असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणे अपेक्षित असते.

जर शासकीय निवासस्थान उपलब्ध नसल्यास कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA) दिला जातो. मात्र HRA घेणारा कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळाच्या ठिकाणी राहत असल्याची खात्री असणे आवश्यक आहे.

मात्र स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की, काही कर्मचारी दूरच्या शहरांमधून रोज अप-डाऊन करत असूनही HRA घेतात. जर या चर्चेत तथ्य आढळले तर हा प्रकार शासनाच्या निधीची दिशाभूल किंवा आर्थिक अनियमितता ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

याचा परिणाम मात्र थेट रुग्णसेवेवर होत असल्याची तक्रार नातेवाईकांकडून वारंवार पुढे येते. कारण अप-डाऊन करणारे कर्मचारी वेळेवर हजर नसणे, आपत्कालीन परिस्थितीत उशीर होणे अशा तक्रारी नागरिकांमध्ये ऐकायला मिळतात.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने अनेकदा इशारे देऊनही रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचे प्रकार सुरूच असल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. रेल्वे कायद्यानुसार अनधिकृतपणे रेल्वे लाईन ओलांडणे हा दंडनीय गुन्हा आहे.आता महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होत आहे की —उपजिल्हा रुग्णालयातील नेमके किती कर्मचारी HRA घेतात?

त्यापैकी किती जण प्रत्यक्ष मुख्यालयी राहतात? आणि किती कर्मचारी रोज अप-डाऊन करतात?या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेसाठी असते पण जर कर्मचारीच नियमांकडे दुर्लक्ष करत असतील, तर प्रश्न फक्त नियमांचा नाही तर रुग्णांच्या सुरक्षिततेचाही आहे.आता प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार की सगळे काही “जैसे थे” राहणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

photo – Ai Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!