Join WhatsApp group

Ads

बाळापूर तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातचा नवा फॉर्म्युला – फाईल आणि पाणी स्वतः घेऊन या

By Sarkar Maza

March 12, 2026 8:17 am

Ads

बाळापूर – दिनांक १२ –


कडक उन्हात तहान लागली की माणूस पहिल्यांदा पाण्याचा शोध घेतो. पण बाळापूरच्या तहसील कार्यालयात गेल्यावर चित्र थोडं वेगळंच दिसतं. कामासाठी पायऱ्या चढत किल्ल्यात पोहोचलेल्या नागरिकांना कागदपत्रांच्या फेऱ्यांबरोबर पाण्यासाठीही शोधाशोध करावी लागते, कारण इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोयच नाही.


बाळापूर तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात दररोज तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिक विविध कामांसाठी येत असतात. दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय कागदपत्रे या सगळ्या कामांसाठी आधी किल्ल्यातील पायऱ्या चढा, मग कार्यालयात रांगेत उभे राहा. पण एवढ्या उन्हात दमलेल्या नागरिकांसाठी पाण्याचा साधा घागरही नाही, ही वास्तवस्थिती आहे.


वृद्ध महिला-पुरुष, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक या पायऱ्या चढून कार्यालयात पोहोचतात. उन्हाचा तडाखा वेगळाच असतो. अशा वेळी तहान लागणे साहजिकच. पण तहसीलसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात पिण्याच्या पाण्याचीच सोय नसेल, तर नागरिकांनी करायचं तरी काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.


सरकारी कार्यालयात रोज शेकडो लोक ये-जा करतात. मग पिण्याच्या पाण्याची टाकी किंवा वॉटर कूलर ठेवणे इतकं कठीण आहे का? की ही गरज प्रशासनाच्या नजरेत अजूनही आली नाही?


उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना जर एखादा नागरिक तहानेमुळे त्रस्त झाला किंवा तब्येत बिघडली, तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही आता उपस्थित होतोय.

कागदपत्रांची कामं करण्यासाठी तहसीलमध्ये यावंच लागणार… पण सध्याच्या परिस्थितीत “फाईलसोबत पाण्याची बाटलीही घेऊन या”, अशीच वेळ नागरिकांवर आली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!