Join WhatsApp group

Ads

-

मूर्तिजापूरात वरलीचा अंडरग्राऊंड बाजार तेजीत : मुख्य सूत्रधारांवर हात का नाही? पोलिसांच्या भूमिकेवर संशय, लोकप्रतिनिधी मौखिक आदेशाची पायमल्ली.

By Sarkar Maza

March 8, 2026 11:12 am

Ads

जर मुख्य मालक वेळेवर पदर झटकत असेल तर रिस्क घेऊन धंधा करण्यात अर्थ काय ? – छोटे एजंट

पोलीस कारवाई होऊन सुद्धा पारदर्शकतेची कमी

मूर्तिजापूर : दिनांक ०८ : मूर्तिजापूरात शहरात सध्या भूमिगत पद्धतीने सुरू असलेल्या वरली (जुगार) व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले असून अनेक ठिकाणी हा अवैध व्यवसाय जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप होत आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एका जणाला ताब्यात घेतले होते. मात्र कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपींकडून पोलीसांनी विडीओ रेकॉर्डिंग करून घेतली असून या मध्ये आरोपीने या अड्ड्याच्या मूळ मालकाचे नाव स्पष्टपणे सांगितले तरीही संबंधित मुख्य मालकावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, शहरात १० ते १५ वरली व्यवसाय शहरात भूमिगत पद्धतीने चालवले जात असून त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे. तसेच मूळ मालकाला राजकीय आशीर्वाद असल्याची शहरात रंगली आहे, त्यामुळे केवळ छोटे एजंट किंवा काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करून मुख्य सूत्रधारांना मोकळे सोडले जात असल्याची चर्चा जोर धरत आहे. या मागील रहस्य काय ? असे प्रश्न निर्माण होत आहे.

काही दिवसा अगोदर आमदार हरीश पिंपळे यांनी शहरात सुरु असलेल्या अवैध व्यवसाय वर पूर्ण पणे बंदी घालावी असे मौखिक आदेश सुद्धा प्रशासनाला दिले होते. तरी या आदेशाची पायमल्ली होताना शहरात दिसत आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वरली व्यवसाय चालवणाऱ्या मुख्य मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा अवैध व्यवसायांना आळा बसणार नाही, असेही मत व्यक्त केले जात आहे.

news photo – from internet

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!