Join WhatsApp group

Ads

तेल्हारा तालुक्यात भीषण अपघात तीन शाळकरी मुलांनचा जागीच मृत्यू

By Sarkar Maza

March 1, 2026 6:14 pm

Ads

अकोला : दिनांक ०१ :  अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. तेल्हारा-माळेगाव बाजार रोडवर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने तीन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. ही घटना शेरी गावाजवळ असलेल्या फाट्यावर घडली असून अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणेश दीपक अप्तुरकर (17), दर्शन रामेश्वर वैष्णव (16) आणि साई रामेश्वर वैष्णव (13) अपघातात मृत पावलेल्यांची नावं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दर्शन आणि साई हे सख्खे भाऊ असल्याने त्यांच्या कुटुंबार दु:खाचा डोंगर पसरला आहे.तिघेही शाळकरी विद्यार्थी असून बंद पडलेल्या दुचाकीजवळ उभे असताना ही दुर्घटना घडली. भरधाव वेगात आलेल्या आयशरने नियंत्रण गमावल्याने मुलांना जोरदार धडक दिली, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेने माळेगाव बाजार परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पोलिसांची कारवाई, परिसरात शोककळा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित आयशर वाहन जप्त करण्यात आले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाची फिर्याद तेल्हारा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.अपघाताचे नेमके कारण काय, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाची चूक कितपत होती ,याचा सखोल तपास सुरू आहे.

एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी या मार्गावर वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रण कडक करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता धोकादायक ठरत असल्याची चर्चा आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटना टाळाव्यात,अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!