Join WhatsApp group

Ads

सोशल मीडियावर मैत्री, प्रेम अन् वाद, प्रियकराने विवाहीत प्रेयसीच्या घरी जाऊन घेतला जीव, नंतर स्वत:लाही संपवलं

By Sarkar Maza

March 1, 2026 7:23 am

Ads

Sarkar Maza News Collectives Room :

जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय विवाहीत प्रेयसी वेळ देत नसल्याचा राग मनात धरुन 40 वर्षीय प्रियकर हा तिच्या घरात गेला. त्याने महिलेवर पिस्तूल रोखत गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावच्या चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या गावात घडली आहे. घटना घडली तेव्हा महिलेचा पती जगदीश पाटील हे घरी नव्हते. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर (वय 40 वर्ष) हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. जगदीश पाटील यांची मुलगी शनिवारी (28 फेब्रुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोन मृतदेह पाहून हंबरडा फोडला. तिने तातडीने घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

नेमकं प्रकरण काय?

जगदीश काशिनाथ पाटील यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. या इंस्टाग्रामवरील ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर पुढे प्रेमात झालं होतं. काही दिवसांपासून प्रेयसी अनिता ही देवा धनगर याला वेळ देत नसल्या कारणाने तो रागावला होता. याच रागातून देवा धनगर रागाच्या भरात अनिता पाटील हिच्या अकुलखेडा येथील राहत्या घरी गेला. तिने त्याने वेळ का देत नाही? म्हणून जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. याच वादात देवा धनगरने गावठी पिस्टलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. यानंतर देवा धनगरने स्वतःवरही गोळी झाडून स्वतःलाही संपवले, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी मयत देवा धनगर याची दुचाकी आढळली आहे. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळतातच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले. या प्रकरणी पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!