Join WhatsApp group

Ads

किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणाची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली.

By Sarkar Maza

February 28, 2026 7:53 am

Ads

किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली.

.बुलढाणा: धामणगाव बढे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील पोफळी येथील शेतशिवारात एका अंदाजे वय 25 ते 30 वर्षीय युवकाची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत निवृत्ती सुरडकर ( अंदाजे वय 25 ते 30, रा. पोफळी) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोफळी येथील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात ही घटना घडली. मृतक अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील असून, त्यांच्यात गेल्या काही काळापासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. आज याच जुन्या वादाचे पर्यावसान टोकाच्या संघर्षात झाले.

पाच जणांकडून जीवघेणा हल्ला

वाद विकोपाला गेल्यानंतर पाचही आरोपींनी मिळून अनिकेतला गाठले. लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर, छातीवर, मानेवर, पाठीवर आणि पायावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाच आरोपी अटकेत

या प्रकरणी मृतक अनिकेतचा चुलत भाऊ विजय सुरडकर यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खालील ५ आरोपींना अटक केली आहे:
१) ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर (वय ३४)
२) लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे (वय २२)
३) कृणाल जानराव सुरडकर (वय २०)
४) निलेश बाळ बोदडे (वय ३०)
५) क्रिष्णा रमेश अंभोरे (सर्व रा. पोफळी, ता. मोताळा)

पोलीस कारवाई

धामणगाव बढे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) २०२३ च्या कलम १०३, १८९(२), (४), १९०, १९१(२) (३), ३५१(२) (३), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!