Join WhatsApp group

Ads

--

अंमली पदार्थ ते जुगार प्रकरणे; सराईत गुन्हेगार किर्ती गुंजाळ वर्षभरासाठी तडीपार, कलम ५६ चा बडगा! ठाणेदार अजित जाधव यांची ‘गुन्हेगारीवर शून्य सहनशीलता’ची भूमिका

By Sarkar Maza

February 26, 2026 10:02 am

Ads

मूर्तिजापूर (दिनांक २६) – शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम किर्ती व्यंकट गुंजाळ (वय ४०, रा. वडरपुरा, मूर्तिजापूर, जि. अकोला) याला अकोला, अमरावती व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत. वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभाग आणि प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही सुधारणा न झाल्याने ही कडक कारवाई करण्यात आली.

पोलीस अभिलेखानुसार गुंजाळ याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलामार्फत अंमली पदार्थांची वाहतूक, अवैध दारू तस्करी, सार्वजनिक ठिकाणी जुगार, अश्लील कृत्ये व गाणी, इच्छापूर्वक दुखापत, फौजदारी धाकदपटशा तसेच महिलेच्या संमतीविना गर्भपात अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. या कृत्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

या इसमावर यापूर्वी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, मूर्तिजापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून संबंधित इसमाला तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कंटाळे व जीवन अंभोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

अजित जाधव ठाणेदारांची प्रतिक्रिया

याबाबत बोलताना ठाणेदार अजित जाधव म्हणाले, “शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.”

स्थानिक गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे ठोस पाऊल मानले जात असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


हद्दपारी म्हणजे काय?

सतत गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी संबंधित जिल्हा किंवा परिसरातून बाहेर पाठवण्याची प्रशासकीय कारवाई म्हणजे हद्दपारी होय.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!