Join WhatsApp group

Ads

अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग; हात धरून विनयभंगाचा प्रयत्न, आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा

By Sarkar Maza

February 26, 2026 9:25 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक २६ : शहरातील चिखली गेट परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा दुचाकीवरून पाठलाग करून जबरदस्तीने हात पकडत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) रात्री घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी संतोष जाधव (वय अंदाजे २५, रा. मूर्तिजापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, १५ वर्षे २ महिने वयाची पीडित विद्यार्थिनी ही आपल्या बहिणीसह स्कुटीने मूर्तिजापूरहून चिखलीकडे जात असताना सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. चिखली गेट येथे स्कुटी आडवी लावून तिला जबरदस्तीने थांबवण्यात आले. ‘मला बोलायचे आहे’ असे म्हणत आरोपीने पीडितेचा डावा हात जबरदस्तीने पकडला. या प्रकारामुळे पीडितेच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाली.

विनयभंग करण्याच्या उद्देशाने आरोपीने पाठलाग करून गैरवर्तन केल्याचे फिर्यादीच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर रात्री १०.५० वाजता मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१)(अ), ७८, १२६(२) तसेच POCSO कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही मारहाण, धमकी, दरोडा, चोरी तसेच शस्त्र कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार इरफान शेख करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!