Join WhatsApp group

Ads

-

कृषी सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची चांदूरबाजारात कारवाई

By Sarkar Maza

February 26, 2026 8:30 am

Ads

अमरावती, दि. २५ फेब्रुवारी २०२६ :
कृषी विभागाच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा करून देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर दुपारी करण्यात आली.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश श्रीकृष्ण निमकर (वय ४६), कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चांदूरबाजार यांनी तक्रारदाराच्या वडिलांच्या बँक खात्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत आलेली १७,९५२ रुपयांची अनुदान रक्कम मिळवून दिल्याच्या मोबदल्यात १,००० रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत एसीबी अमरावतीकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सापळा रचून २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.२१ ते २.२७ वाजताच्या दरम्यान आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी पोलीस ठाणे चांदूरबाजार (अमरावती ग्रामीण) येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी तक्रार करण्यासाठी पुढे यावे.
📞 संपर्क – एसीबी कार्यालय, ललित सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती
☎️ ०७२१-२५५२३५५ | 📱 ९४०४२९९६२६ | टोल फ्री – १०६४

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!