Join WhatsApp group

Ads

--

ब्लँंकेटवाटपात धर्म आडवा आला; भाजप नेत्याने मुस्लिम महिलेकडून हिसकावली चादर

By Sarkar Maza

February 24, 2026 9:12 am

Ads

‘धार्मिक भेदभाव हा घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे’, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या कृतीचा निषेध केला आहे.

 राजस्थानमधील टोंक येथे एका ब्लँकेट वाटप कार्यक्रमादरम्यान भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका मुस्लिम महिलेला तिचा धर्म विचारल्यानंतर दिलेले ब्लँकेट परत घेतल्यावरून वाद निर्माण झाला आहे.

रविवारी दुपारी निवाई तहसीलमधील करेडा गावातील एका मंदिर परिसरात ही घटना घडली. त्यावेळी जौनपुरिया हे २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर दौऱ्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी गेले होते. स्थानिकांच्या मते, सुरुवातीला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना ब्लँकेट वाटण्यात आले. परंतु एका मुस्लिम महिलेकडून ते परत घेण्यात आले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना ब्लँकेट घेण्याचा अधिकार नाही. हा कार्यक्रम त्यांचा वैयक्तिक उपक्रम होता आणि कोणत्याही सरकारी योजनेशी जोडलेला नाही,’ असे जौनपुरिया या व्हिडीओ क्लिपमध्ये म्हणताना दिसून येत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करणाऱ्यांना ब्लँकेट घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत असल्याचे दिसून आले आहे.

जौनापुरिया यांचा पुतळ्याचे दहन
दरम्यान, एका युवक काँग्रेस नेत्याने गावात जाऊन मुस्लिम महिलांना ब्लँकेट वाटले आणि भाजपवर विभाजनाचे राजकारण केल्याचा आरोप केला. सोमवारी, गावकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आणि घोषणाबाजी करत निषेध केला. निषेधादरम्यान, जौनापुरिया यांचा पुतळा जाळण्यात आला. टोंकचे आमदार सचिन पायलट यांनी, धर्म आणि जातीवर आधारित भेदभाव केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही तर संवैधानिक अधिकारांचे देखील उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.

‘जुता मार’साठी मशिदी झाकल्या!
वृत्तसंस्था, शहाजहांपूर (उत्तर प्रदेश): येथे पारंपरिक ‘जुता मार होळी’ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मार्गावरील मशिदी व मजारांना ताडपत्रीने झाकून सुरक्षित केले असून, यंदा वाढीव सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शहाजहांपूरमध्ये होळीच्या दिवशी साजरी होणारी ‘जुता मार होळी’ ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या मिरवणुकीत ब्रिटिश काळातील ‘लाट साहेब’ यांच्या वेशातील व्यक्ती बैलगाडीतून शहरात फिरतात. यावेळी नागरिक त्यांच्यावर चप्पल, जोडे फेकत रंगांची उधळण करतात.मागील वर्षी या मिरवणुकीदरम्यान काही ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर चप्पल, बाटल्या फेकल्या गेल्याने सौम्य लाठीमार करावा लागला होता. मात्र, यंदा कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!