Join WhatsApp group

Ads

कॉलेज पार्टीत पेयातून गुंगीचं औषध, सख्ख्या भावांचा विद्यार्थिनीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, महाराष्ट्र हादरला

By Sarkar Maza

February 23, 2026 3:12 pm

Ads

कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले आणि तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तब्बल सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) या दोन भावांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नेमकं काय घडलं?

तक्रारीनुसार, २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चेतन आणि आकाश हे दोघेही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यार्थिनीला पार्टीसाठी बोलावले. पार्टीदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळण्यात आले. पेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर हॉटेलमधील एका खोलीत चेतन अंबाडकर याने तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओवरुन ब्लॅकमेल

या घटनेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी विद्यार्थिनीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवत ५ लाख रुपयांची मागणीही केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र, मानसिक छळ असह्य झाल्यानंतर तिने अखेर धाडस दाखवत नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!