Join WhatsApp group

Ads

रमजान साठी आली माहेरी आणि सख्ख्या मावशीकडून २१ महिन्यांच्या बालकाची गळा दाबून हत्या

By Sarkar Maza

February 21, 2026 9:16 am

Ads

सरकार माझा न्यूज डेस्क : २१ फेब्रुवारी २६ :

दिनांक २० फेब्रुवारी २६ रोजी दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. रमजान सणानिमित्त माहेरी आलेल्या महिलेच्या २१ महिन्यांच्या चिमुकल्याची तिच्याच सख्ख्या बहिणीने कथित गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मृत बालकाची ओळख हादी अशी असून तो आपल्या वडिलांसोबत सीलमपूर येथील ओल्ड सीलमपूर भागात राहत होता. रमजानमुळे त्याची आई उझमा माहेरी आली होती. आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

पार्कमध्ये नेऊन केला खून

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अजरा (वय ३०) हिने मुलाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एसएफएस फ्लॅट्समधील पार्कमध्ये नेले. तेथे संधी साधून तिने त्याचा गळा दाबला. घटनेदरम्यान तेथून जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने हा प्रकार पाहताच तात्काळ हस्तक्षेप करून मुलाला तिच्या तावडीतून सोडवले.

जखमी अवस्थेत चिमुकल्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

पीसीआर कॉलवरून उघड झाला प्रकार

दुपारी सुमारे १.३० वाजता पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे घटनेची माहिती मिळाली. मृत बालकाच्या मामानेच पोलिसांना फोन करून “माझ्या भाच्याची हत्या झाली असून ती माझ्या बहिणीने केली” अशी माहिती दिली.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वारदातीनंतर आरोपी अजरा घटनास्थळीच बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी बाबू जगजीवन राम मेमोरियल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणामागे मानसिक ताण, कौटुंबिक वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!