Join WhatsApp group

Ads

टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून वाद; पत्नीने पतीची चाकूने हत्या

By Sarkar Maza

February 21, 2026 9:17 am

Ads

Sarkar Maza News Desk : Date : 21 feb.26

आंध्र प्रदेशातील मंगलगिरी येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्यामुळे झालेल्या भांडणात पत्नीने पतीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला.

मृताची ओळख शेख अहमद (वय २७) अशी असून तो व्यवसायाने एसी मेकॅनिक होता. अहमद आपल्या पत्नीसोबत टिडको हाउसिंग कॉलनीमध्ये राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पत्नीने अहमदवर चाकूने वार केले.

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तात्काळ अहमदला विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!