Join WhatsApp group

Ads

--

विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेडछाड करणाऱ्या आरोपीस अटक अकोला पोलिसांची तत्पर व यशस्वी

By Sarkar Maza

February 18, 2026 4:17 pm

Ads

दिनांक १८ : अकोला : दिनांक 14/02/2026 रोजी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला हद्दीतील तोष्णीवाल ले-आऊट परिसरात एक गंभीर व चिंताजनक घटना घडली होती. सकाळच्या सुमारास एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे क्लासला जात असताना, अज्ञात मोपेड वाहनचालकाने तिचा पाठलाग केला व तिचे ओळखपत्र (आय-कार्ड) जबरदस्तीने ओढून तिची छेडछाड केली होती. अशा प्रकारचा व्हीडिओ सोशल मीडिया वर प्रसारित झाला होता. अकोला शहरात कोचिंग साठी बाहेर जिल्ह्यातून विदयार्थी येतात त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची बाब आहे. घटनेची गंभीर दखल घेत मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले होते.

आदेशानुसार गुन्ह्याचा समांतर व सखोल तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयित आरोपीचे वर्णन तसेच त्याने वापरलेली मोटारसायकल रंग, मॉडेल व कंपनी याबाबत माहिती निश्चित करण्यात आली. त्याआधारे २०० हून अधिक मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली. तसेच घटनेच्या परिसरात व आजूबाजूच्या भागात असलेल्या ३०० पेक्षा जास्त CCTV कैमेन्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. तपासात तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन्, तसेच खबऱ्यांकडून मिळालेली गोपनीय माहिती यांचा प्रभावी वापर करण्यात आला. अशा प्रकारची घटना पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीत सुद्धा घडली आहे अशी फोन द्वारे माहिती प्राप्त झाली होती.

परंतु आरोपीने दुसरे वाहन वापरले होते त्यानुसार डाबकी रोड पोलिसांच्या मदतीने आरोपी वर पाळत ठेऊन अथक परिश्रम, सातत्यपूर्ण शोधमोहीम व अचूक माहितीच्या आधारे अखेर सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या घटनेबाबत संबंधित विद्यार्थिनीने पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे दिलेल्या फिर्यादीवरून अप. क्र. 342/2026, कलम 74, 75(2), 78 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विवेक उर्फ विकी दिलीपराव खांडेकर रा. वानखेडे नगर, डाबकी रोड, अकोला अटक करण्यात आली आहे.

सदरची संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, हेड कॉन्स्टेबल शेख वसीम, महेंद्र मलिये, स्वी खंदारे, किशोर सोनोने, अब्दुल माजिद तसेच पोलीस ठाणे डाबकी रोड PI दिपक रामकृष्ण कोळी, Psi अनिल राजुसिंग चव्हाण, Asi -दिपक प्रल्हादराव तायडे, HC प्रविण पुरुषोत्तम इंगळे. Hc उमेश शालिकराम पाटील, Hc उमेश मनिकलाल सुगंधी NPC राजेश जटाशंकर ठाकूर, मंगेश नामदेव गिते व सिव्हिल लाईन psi- शामली निकम,pc-शक्ति कांबळे या पथकाने मोलाचे योगदान दिले

सदर कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षितते बाबत अकोला पोलीस दलाची आरोपी विरुद्ध कठोर भूमिका अधोरेखित झाली असून, अशा प्रकारच्या गुन्हाांमध्ये गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून आलेत तात्काळ अकोला पोलिसांची संपर्क साधावा असे विद्यार्थी तसेच नागरिकांनी आवाहन करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!