Join WhatsApp group

Ads

मनमिळाऊ स्वभावाचा आधारवड हरपला; शैलेश जैस्वाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By Sarkar Maza

February 18, 2026 9:46 am

Ads

मुर्तीजापूर : दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ : शहरातील परिचित व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेले श्री. शैलेश जुगलकिशोर जैस्वाल यांचे आज पहाटे २.०० वाजता ब्रेन स्ट्रोकमुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली असून व्यापारी व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

शैलेश जैस्वाल हे व्यवसायाने कुशल छायाचित्रकार होते. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी असंख्य आठवणी जिवंत केल्या. कार्यक्रम असो, सामाजिक उपक्रम असो किंवा कौटुंबिक सोहळे – प्रत्येक क्षण अचूक टिपण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यांच्या कामातील बारकावे, वेळेची शिस्त आणि ग्राहकांशी जपलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे त्यांनी अल्पावधीतच मोठा विश्वास संपादन केला होता.

व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे शैलेश हे हसतमुख, मदतीस तत्पर आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व होते. गरजूंना मदत करणे, मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण करणे आणि तरुणांना मार्गदर्शन करणे ही त्यांची ओळख होती. त्यांच्या साधेपणा व प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले.

त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहराने एक कष्टाळू, प्रामाणिक व जिवाभावाचा माणूस गमावला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा आप्तस्वकीयांचा मोठा परिवार आहे.

अंतिम यात्रा :
बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता त्यांच्या प्रतिक नगर येथील निज निवासस्थानातून अंतिम यात्रा निघून अमरावती रोड बायपास मार्गे हिंदू स्मशानभूमी, मुर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्री. शैलेश जुगलकिशोर जैस्वाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!