Join WhatsApp group

Ads

महाशिवरात्रीनिमित्त नागौडेश्वर मंदिरात फराडाचे वाटप; १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन

By Sarkar Maza

February 15, 2026 7:52 pm

Ads


मूर्तिजापूर न्यूज :दिनांक 15:महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नागौडेश्वर मंदिर येथे भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज मंदिर परिसरात भाविकांना फराडाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने शिवभक्तांनी मंदिरात उपस्थित राहून भगवान शिवाचे दर्शन घेतले व फराडाचा प्रसाद स्वीकारला.
मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विशेष पूजन, अभिषेक व आरतीचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

तसेच, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!