Join WhatsApp group

Ads

अटल फाउंडेशनच्या वतीने मंदिर स्वच्छता अभियान संपन्न

By Sarkar Maza

February 14, 2026 2:35 pm

Ads

मुर्तीजापुर- दिनांक १४ : अटल फाउंडेशन महाराष्ट्र यांचे वतीने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छता ही सेवा या संकल्पनेवर आधारित मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंह त्रिपाठी प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांचे मार्गदर्शनाखाली प्रदेश महामंत्री विष्णू लोडम यांचे पुढाकाराने जिल्हाध्यक्ष रूपाली तिडके यांचे नेतृत्वात जुनी वस्ती येथील प्राचीन श्री नागोडेश्वर महादेव मंदिर येथे अटल फाउंडेशन अकोला जिल्हा शाखा मूर्तिजापूरच्या वतीने महाशिवरात्रीचे पावन औचित्य साधून मंदिर स्वच्छता अभियान राबवीण्यात आले अटल फाउंडेशन च्या वतीने वर्षभर चालणाऱ्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमाबद्दल माननीय आमदार हरीशभाऊ पिंपळे तसेच नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून साधना आणि आस्थेचे अधिष्ठान आहे या पवित्र ठिकाणी संस्कार मिळतात यामुळेच संस्कारशील नागरिक व संस्कारीत समाज घडतो म्हणूनच स्वच्छ मंदिर आणि अटल विचार पुढे नेऊया असे मत अटल फाउंडेशनचे प्रदेश महामंत्री विष्णू लोडम यांनी व्यक्त केले.

स्वच्छता अभियानामध्ये विशेष सहकार्य करणाऱ्या माऊली भजन मंडळाच्या सदस्यांचे विशेष आभार जिल्हाध्यक्ष रूपालीताई तिडके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाला प्रामुख्याने राज्य परिषद सदस्य भाजपा श्री राजकुमार नाचणे भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक राम जोशी नगरसेवक गजानन नाकट रामाभाऊ हजारे कैलास महाजन समाजसेवक दिवाकर सोनाने विलास वानखडे रमेश दर्यानि कैलास गचके यांनी सुद्धा स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदविला मंदिराचे सभागृह, गर्भगृह व परिसरात व्यापक स्वच्छता करण्यात आली व अटल फाउंडेशन च्या वतीने मंदिर परिसर स्वच्छ राहावा या हेतूने कचरा पेटी भेट देण्यात आल्या यामुळे भाविकांमध्ये समाधान पाहायला मिळाले असे कार्यक्रम नित्य व्हावे असे नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अटल फाउंडेशन जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. स्वाती पोटे उपाध्यक्ष निकिता शर्मा तालुका अध्यक्ष कविता साखरे निरंजन सोळंके युवती तालुकाध्यक्ष शिवकन्या कु.शिवानी श्रीराव शहराध्यक्ष माया दवंडे, दिनेश श्रीवास उपाध्यक्ष श्याम काकडे शहर सचिव सोनल बांगड रूपाली गुल्हाने वनस्कार ताई इत्यादी अटल फाउंडेशन चे पदाधिकारी व माऊली भजन मंडळ च्या बेबीताई पिंपळकर वच्छला वानखडे लता इंगोले बेबी धामोरे पुष्पा इंगळे लता श्रीनाथ सुनिता गचके आशा गवळे संतोष गिरी यांनी परिश्रम घेतले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!