Join WhatsApp group

Ads

अकोला पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेस प्रारंभ. आज 800 पैकी 610 उमेदवारांनी लावली हजेरी..।

By Sarkarmzanews

February 11, 2026 7:11 pm

Ads

अकोला : दिनांक ११ :

अकोला पोलीस दलातर्फे, पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2024-2025धील पोलीस शिपाई 161 पदांची भरती प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालय, अकोला येथे सुरू करण्यात आली आहे.

एकूण 161 पोलीस शिपाई पदांसाठी ११,७८४ अर्ज प्राप्त झाले असून आज 800 उमेदवारांना बोलावण्यात आले, त्यापैकी 610 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 544 शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवार यांनी परीक्षा दिली त्या पैकी 25 पेक्षा जास्त गुण घेऊन 307 उमेदवार पात्र ठरले.

भरती प्रक्रियेत शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी व कागदपत्र तपासणीचा समावेश आहे. भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ नुसार सुरळीत, पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबविण्यात येत आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, मोबाइल टॉयलेट, P.A. सिस्टीम आदी सुविधा उपलब्ध आहेत. ओळख तपासणीसाठी डिजिटल फोटो, बायोमेट्रिक प्रणाली व RFID तंत्रज्ञान वापरण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया CCTV व व्हिडिओ चित्रीकरणाखाली पार पडत आहे. कोणत्याही गैरप्रकारास कडक कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांनी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व दोन झेरॉक्स प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी आधारकार्ड, पासपोर्ट साईज रंगीत फोटो (६ प्रती), १२ वी पास गुणपत्रिका/बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (TC), जन्मदाखला किंवा एस.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नौन-किमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), ईडब्ल्यू.एस./एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक कौशल्य प्रमाणपत्रे (असल्यास) सोबत आणणे अनिवार्य आहे. समांतर आरक्षणातील उमेदवार (माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, गृह रक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ इ.) यांनी संबंधित वैध प्रमाणपत्रे अनिवार्यपणे सादर करावीत. टीप: सर्व उमेदवारांनी वरील सर्व कागदपत्रांची एक मूळ प्रत व दोन झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

सर्व प्रमाणपत्रे दि. ०७.१२.२०२५ पूर्वीची असावीत. बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था मल्टिपर्पज हॉल, निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रक्रिये दरम्यान केळी, बिस्कीट, ग्लुकोज वाटप करण्यात आले.

पोलीस शिपाई भरती 2024-2025 प्रक्रियेसाठी उपस्थित होणाऱ्या सर्व उमेदवारांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना याद्वारे जहीर आवाहन करण्यात येत आहे की, काही फसवणूक करणारे इसम “पोलीस भरती करून देतो”, “ओळखीचा वापर करून मदत करतो अशा प्रकारची खोटी आश्वासने देऊन उमेदवारांकडून पैशांची मागणी करण्याचा प्रयत्न करु शकतात. कृपया अशा कोणत्याही इसमांवर विश्वास ठेवू नये, पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असून ती सीसीटीव्ही निगराणीखाली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व कडक पोलीस बंदोबस्तात पार पाडली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे कोणीही पैशांची मागणी केल्यास, तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात, किवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला-मदत क्रमांक 1064 येथे त्वस्ति संपर्क करावा, तसेच पोलीस अधीक्षक गृह (मुख्यालय) अकोला 0724 244 5305, पोलीस नियंत्रण कक्ष-0724 243 5500, संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!