Join WhatsApp group

Ads

-

अमरावतीत हॉटेलवर पोलिसांचा छापा; तीन प्रेमी युगल आढळले, परिसरात खळबळ

By Sarkarmzanews

February 8, 2026 11:26 am

Ads

अमरावती, दि.७ : अमरावती–नागपूर मार्गावरील रिंगरोड परिसरातील हॉटेल निमंत्रण येथे अमरावती शहर पोलिसांनी शनिवारी (ता.७) दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास छापामार कारवाई केली. या कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये तीन प्रेमी युगल आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये काही जोडपी थांबत असल्याची तसेच तासाच्या आधारावर पैसे घेतले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये काही अश्लील साहित्यही आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका तपासली जात आहे. अधिक तपास अमरावती शहर पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!