Join WhatsApp group

Ads

-

तक्रारीच्या रागातून काठीने मारहाण; मुर्तिजापूर शहरात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

February 6, 2026 4:26 pm

Ads

मुर्तिजापूर : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नम्रतानगर, चिखली गेट परिसरात मारहाणीची घटना घडल्याने चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी सौ. छाया हरीभाऊ दुधमल (वय ५०, रा. नम्रतानगर, चिखली गेट, मुर्तिजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो. स्टे. मुर्तिजापूर शहर येथे अप. नं. १४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी यापूर्वी आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी, त्यांच्या मुलगी व पती यांना काठी व पट्ट्याने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेत तिघांनाही दुखापत झाली असून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुरेश पांडे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई हेड कॉन्स्टेबल गजानन चांभारे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!