Join WhatsApp group

Ads

-

शेतकऱ्यांना दिलासा : बकरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

By Sarkarmzanews

February 5, 2026 6:51 pm

Ads

मूर्तिजापूर प्रतिनिधी — माना पोलीस स्टेशन, जि. अकोला हद्दीत दाखल गुन्हा रजिस्टर क्र. ०१/२०२६ अंतर्गत बकरी चोरी प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात माना पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश रघुनाथ पाथरे (वय ३४, रा. गुंजवाडा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.०० ते ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान गुंजवाडा शेतशिवार, गट क्रमांक ७५ येथून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती.

या प्रकरणात यापूर्वी चोरीस गेलेल्या बकऱ्या एका आरोपीकडून जप्त करण्यात आल्या होत्या, तर उर्वरित आरोपी फरार होते.

माना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत फरार आरोपींचा शोध घेत खालील आरोपींना अटक केली — रोहन रामराव ढोके (वय २१, रा. उमरी बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती),मोहन जीवन शिवरकर (वय ३२, . पार्डी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) आणिमयूर हिम्मतराव ढोके (वय २८, रा. उमरी ममदाबाद, ता. दर्यापूर).

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन (एमएच २७ एच ९४२२) किंमत अंदाजे ₹६० हजार तसेच दुचाकी वाहन (एमएच २७ एचजी ८३७२) किंमत अंदाजे ₹२५ हजार जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले व महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री मेंढे यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.सदर प्रकरणाचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!