Join WhatsApp group

Ads

श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा संदेश; संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी साजरी

By Sarkarmzanews

February 4, 2026 4:23 pm

Ads

मूर्तिजापूर : संत नरहरी सोनार महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत असून त्यांनी भक्ती, प्रामाणिक श्रम व ईश्वरनिष्ठेचा आदर्श समाजापुढे ठेवला. सोनार व्यवसाय करत असताना देखील त्यांनी विठ्ठलभक्तीला सर्वोच्च स्थान दिले.

कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली सेवा, प्रामाणिक कष्ट आणि भक्तीभाव यामुळे ते संतपदाला पोहोचले.

त्यांच्या जीवनातून “काम हेच पूजा” आणि “भक्तीतूनच समाजपरिवर्तन” हा संदेश आजही प्रेरणादायी ठरतो.

संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यालयात श्रद्धेने व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरीश पिंपळे होते. यावेळी नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपनगराध्यक्ष रोहित अव्वलवार यांच्यासह सोनार समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजातील एकता, सामाजिक समता व नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास सोनार समाजाचे मनोहर लोणकर, रविंद्र विंचुरकर, प्रमोद गोगटे, राजू प्रांजळे, शेखर बुटे, सुनील बनुबाकोडे, विक्की शेरकर, अरुण बनुबाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी संत नरहरी महाराज यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करावा, असे आवाहन केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!