Join WhatsApp group

Ads

--

‘नायक’सारख्या निर्णयक्षम नेतृत्वाची जनतेला अपेक्षा आणि डम्पिंग ग्राउंड वरील जळता कचरा

By Sarkarmzanews

January 16, 2026 1:35 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १६ : युवा, तडफदार, उच्च शिक्षित नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्याकडून मुर्तिजापूर शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.

‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे क्षणात निर्णय घेऊन, फाईल्सच्या ढिगाऱ्यात न अडकता थेट मैदानात उतरून जनतेच्या प्रश्नांवर कठोर पणे न्याय निर्णय घेणारे नेतृत्व शहराला मिळाला, अशी अपेक्षा जनता त्यांच्या कडून व्यक्त करत आहे.

आज शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक चित्र दिसत आहे. मुर्तिजापूर नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी दररोज नगरसेवकांचा आदेशाने प्रामाणिकपणे घनकचरा उचलण्याचे काम करत आहेत.

त्यांच्या खऱ्या मेहनतीमुळे शहरातील अनेक भाग कचरा मुक्त होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या कामासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असून ही बाब नक्कीच शाबासकी देण्यासारखी आहे.

मात्र या स्वच्छतेच्या कामावर काही प्रभागातील नगरसेवकांकडून प्रत्यक्ष सहभागापेक्षा सोशल मीडियावर गाजावाजा अधिक केला जात असल्याचे चित्रही दिसत आहे.

स्वच्छतेचे खरे श्रेय आरोग्य कर्मचाऱ्यांना असताना, फोटोसेशन आणि पोस्टद्वारे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

या सकारात्मक चित्राच्या दुसऱ्या बाजूला मात्र एक गंभीर आणि जळता प्रश्न उभा आहे. तो म्हणजे शहरातून उचलला जाणारा घनकचरा डम्पिंग ग्राउंड वर थेट जाळला जात आहे.

घनकचरा उचलणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्याची शास्त्रीय, शाश्वत आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे.

आज त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये सर्रास कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून त्याचा थेट त्रास महाकाली नगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ही परिस्थिती केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर पर्यावरणासाठीही गंभीर धोका निर्माण करणारी आहे.

आमदार हरीश पिंपळे यांच्या राजकीय तल्लख बुद्धीने व आशीर्वादाने बसवलेली राजकीय यंत्रणा, तसेच विरोधी पक्षातील राजकीय मित्र नगरसेवक व अधिकारी वर्ग या प्रश्नावर ठोस उपाययोजना करतील का? हा सवाल उपस्थित होत आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ उचलण्यापुरते मर्यादित न राहता त्याच्या विल्हेवाटीपर्यंत पोहोचणार का?

आज मुर्तिजापूरची जनता स्वच्छ शहराबरोबरच प्रदूषणमुक्त भविष्यासाठीही निर्णयक्षम नेतृत्वाकडे पाहत आहे.

‘नायक चित्रपट’मधील अनिल कपूर प्रमाणे नगराध्यक्ष हर्षल साबळे केवळ बोलून नव्हे, तर कृतीतून बदल घडवण्याची अपेक्षा आता जनते कडून व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!