Join WhatsApp group

Ads

अटल फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य जाहीर सत्कार

By Sarkarmzanews

January 14, 2026 8:29 am

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अटल फाउंडेशनच्या वतीने अखंड हिंदुस्तानाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या राजमाता माँसाहेब जिजाऊ व युवाशक्तीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा सोहळा अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंह व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश महामंत्री विष्णू लोडम व अकोला जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली केतन तिडके यांच्या नेतृत्वात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

मातृसंस्कार, राष्ट्रनिष्ठा व स्वाभिमानाची प्रेरणा देणाऱ्या या महामानवांना उपस्थितांनी अभिवादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षलदादा साबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटील समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके, अटल फाउंडेशन प्रदेश उपाध्यक्ष महेश आप्पा शेटे, उद्योजक प्रशांत हजारी, अविनाश बांबल सर व राजेंद्र इंगोले उपस्थित होते.सुप्रसिद्ध कवी-गायक कल्पक कांबळे व माया दवंडे यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित भक्तिगीते सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.

यानंतर मुर्तिजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यास सर्वच नगरसेवक उपस्थित राहिल्याने सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश देण्यात आला.यावेळी राजकीय, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक राम जोशी व प्रा. एल. डी. सरोदे यांना राज्यस्तरीय ‘मूकनायक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तसेच मिलिंद इंगळे यांना कोल्हापूर येथे मिळालेल्या ‘सामाजिक महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात अटल फाउंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आल्या.

यामध्ये सौ. नंदिनी प्रेम शर्मा यांची अकोला जिल्हा सचिवपदी, श्याम डोंगरे जिल्हा सरचिटणीसपदी, राहुल बसवेश्वर आप्पा मिटकरी तालुका अध्यक्ष (तेल्हारा) व एजाज अहमद जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.प्रास्ताविक समाजसेवक विष्णू लोडम यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. शिवानी श्रीराव यांनी प्रभावीपणे सांभाळले.या ऐतिहासिक सोहळ्यास पाटील समाजसेवा मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, महिला, युवक तसेच मुर्तिजापूर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!