Join WhatsApp group

Ads

-

रेल्वे प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

By Sarkarmzanews

January 12, 2026 7:46 pm

Ads

मूर्तिजापूर | १२ जानेवारी

माना ते कुरुम रेल्वे स्थानकादरम्यान ग्राम रामटेकजवळील डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेतून पडून एका अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

ही घटना खांब क्रमांक ६३९/२८ ते ६३९/३० दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी माना पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक ०३/२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी माना रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक कपिल इंगोले यांच्याकडून माना पोलिसांना एक मेमो प्राप्त झाला.

हा मेमो पॉइंटमॅन अर्जुन चौधरी यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यामध्ये ‘माना सेक्शन’मधील डाऊन लाईनवर वरील खांब क्रमांकांच्या दरम्यान एक इसम जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती देण्यात आली होती.त्यानंतर सदर इसमाला तात्काळ उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे हलवण्यात आले.

मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार दीपक सोळंके (ब.नं. १९६९) करीत आहेत.दरम्यान, मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे—काळ्या रंगाचा लोअर, हिरव्या रंगाचा शर्ट, गळ्यात काळा दुपट्टा, उजव्या हाताच्या बोटांत पिवळ्या रंगाच्या धातूच्या तीन अंगठ्या, उजव्या हातावर ‘N’ गोंदलेले चिन्ह, तसेच उजव्या हातावर जुन्या जखमेचे व्रण आढळून आले आहेत. केश काळे, रंग गोरा, सडपातळ बांधा व उंची अंदाजे १.६७ मीटर आहे.या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ माना पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी व ओळख पटविण्यासाठी जतन करून ठेवण्यात आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!