Join WhatsApp group

Ads

स्वाभिमानाचा उत्सव : जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By Sarkarmzanews

January 11, 2026 5:02 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ११ –मातृसंस्कार, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाचे बीज रोवणाऱ्या राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवकांना आत्मबळ व राष्ट्रसेवेची दिशा देणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.याच

याच प्रेरणेतून मुर्तीजापुर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुर्तीजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित हा सोहळा म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वाभिमानाचा आणि विचारांचा उत्सव असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तथा समाजसेवक विष्णू लोडम व अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली केतन तिडके यांच्या पुढाकाराने हा जन्मोत्सव सोहळा सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार हरीश पिंपळे भूषविणार असून, यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

तसेच अटल फाउंडेशनच्या पदनियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात येणार आहेत.जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!