Join WhatsApp group

Ads

-

हातगाव ग्रामपंचायतीत २.२५ लाखांचा घोटाळा उघडकीस! चार वर्षे कारवाई शून्य, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By Sarkarmzanews

January 9, 2026 3:12 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०९ : मुर्तिजापूर तालुक्यात हातगाव ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाला तब्बल चार वर्षे पूर्ण होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश जोगळे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.जुलै २०२५ मध्ये हातगाव ग्रामपंचायतीतील विविध कामकाजाबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता, दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी धनादेश क्रमांक ८२४०४ अन्वये २,२५,०००/- रुपये अन्वर बिल्डर यांच्या नावे अदा करण्यात आल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, हे पैसे कोणतेही ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष काम न करता देण्यात आले असल्याचा आरोप आहे. हा धनादेश तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी (मयत) मदन येवले व तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. बाळासाहेब बायस, पंचायत समिती मुर्तिजापूर यांनी संयुक्त सहीने दिल्याचे कागदोपत्री स्पष्ट होते.

या गंभीर प्रकरणाची तक्रार मे २०२२ मध्येच पंचायत समिती मुर्तिजापूर येथे दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणाला चार वर्षे पूर्ण झाली, तरीही न्याय मिळालेला नाही.

याच पार्श्वभूमीवर दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी श्री. सुरेश जोगळे यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती पुन्हा सादर केली.

तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. बाळासाहेब बायस, अन्वर बिल्डर व संबंधित सरपंच यांच्यावर फौजदारी कारवाई व पोलीस चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

या तक्रारीची प्रत मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांनाही देण्यात आली असून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.दरम्यान, धरणे आंदोलनानंतर ३० जुलै २०२५ रोजी सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या खात्यात जमा करण्यात आली.

मात्र, ही रक्कम कोणी व कशा पद्धतीने जमा केली, याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.“जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा ठाम इशारा सुरेश जोगळे यांनी दिला आहे. या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!