Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुर शहरात स्वच्छता सातत्य किती दिवस काळ टिकणार? नागरिकांचा सवाल

By Sarkarmzanews

January 9, 2026 10:00 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०९ : शहरात सध्या स्वच्छता हा प्रमुख मुद्दा ठरला असूनसर्व नवनिर्वाचित नगरसेवक आपापल्या प्रभागात स्वच्छतेची कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते स्वच्छता, कचरा उचल, गटार सफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यासाठी लोकप्रतिनिधी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत. शहराचा विकासा साठी एक चांगली बाब आहे, तसेच शहरातील नागरिक या मुळे खूप खुश आहे.


नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी स्वच्छतेबाबत ठाम भूमिका घेत नगरपरिषद आरोग्य विभागाला अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन व नगरसेवक समन्वयाने काम करत असून शहरात स्वच्छतेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


मात्र सध्याच्या या गतीबरोबरच नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होत आहे — सर्व नगरसेवकांचा हा उत्साह आणि कामातील सक्रियता संपूर्ण पाच वर्षे कायम राहणार का?


निवडणुकीनंतरच्या सुरुवातीच्या काळात दिसणारी तत्परता पुढील काळातही सातत्याने दिसावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


स्वच्छता ही केवळ मोहिमे पुरती मर्यादित न राहता ती सातत्यपूर्ण प्रक्रिया असावी, यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नियमित लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही स्वच्छता मोहीम दीर्घकालीन स्वरूप घेते की नाही, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

नागरिक काय म्हणतात?

🔹 “सध्या सगळेच नगरसेवक प्रभागात काम करताना दिसत आहेत, ही चांगली सुरुवात आहे; पण पाच वर्षे अशीच उपस्थिती हवी.” (डॉक्टर – विनोद पुंडगे – प्रभाग क्रमांक ०१)

🔹 “आज सर्वत्र हालचाल आहे, उद्या दुर्लक्ष होऊ नये. सातत्य हाच खरा कस आहे. स्वच्छतेची कामे नियमित झाली, तरच शहराचं आरोग्य सुधारेल.” ( नितीन वर्मा, प्रभाग क्रमांक १०)

🔹 “या वेळी केवळ दिखावा नको; प्रत्यक्ष परिणाम दिसले पाहिजेत.” (राहुल येदवर – प्रभाग क्रमांक ०९)

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!