Join WhatsApp group

Ads

२५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२व्या मजल्यावरुन उडी घेतली, बॉडीचे दोन भाग

By Sarkarmzanews

May 27, 2025 7:51 pm

Ads

सोमवारी रात्री हर्षदाने इमारतीच्या सर्वात उंच म्हणजे २२ व्या मजल्यावर जात उडी घेतली. इतक्या उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. आणि ती जागीच गतप्राण झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती.

मुंबई : एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही धक्कादायक घटना मुंबई उपनगरातील विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये सोमवारी (२६ मे) रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षदा तांदोळकर असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हर्षदाने इमारतीच्या सर्वात उंच म्हणजे २२ व्या मजल्यावर जात उडी घेतली. इतक्या उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. आणि ती जागीच गतप्राण झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती. स्थानिकांनी तत्परतेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनाकरिता पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिकांची आणि तिच्या जवळच्या माणसांची चौकशी सुरु केली आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी तरुणीला कोणता शारीरिक किंवा मानसिक त्रास होता का याचा पाठपुरावा पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, तरुणीने आत्महत्या केली असावी असा प्रश्न इमारतीत राहणाऱ्या आणि तीच्या जवळच्या लोकांना पडला आहे. पोलिस तपासांती काय कारण सापडणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!