Join WhatsApp group

Ads

आम्ही अतिक्रमण काढण्यास तयार आहोत ; मात्र दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी

By Sarkarmzanews

December 30, 2024 9:20 pm

Ads

बार्शीटाकळी : श्याम ठक : दि. ३० : बार्शीटाकळी बायपास ते खडकपुरा आणि खोलेश्वर मंदिर मार्गे आठवडी बाजार, मिनारा मशीद असा रस्ता तयार करण्यासाठी, शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काम सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नगर पंचायतीने दीडशे ते दोनशे अतिक्रमणधारकांना आपली दुकाने १५ दिवसांत हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गरीब लोक बेरोजगारीला सामोरे जात आहेत. यामुळे या गरीब अतिक्रमण धारकांनी नगर पंचायतीला सहकार्य करण्यास तयार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले आहे. मात्र आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन नगर पंचायतीने आम्हाला प्रथम जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आम्ही उपासमारीने मरण्याची शक्यता टाळता येईल. बायपास ते पोलीस ठाण्यापर्यंत 24 मीटर रुंदीचा रस्ता तयार करावा लागणार आहे.

त्यासाठी येथे पुरेशी जागा असतानाही नगर पंचायतीने नाल्यामागील दुकाने हटविण्याचे आदेश काढले आहेत. तर दुकानदारांचे म्हणणे आहे की, जी दुकाने काढण्याची गरज आहे तीच तोडण्यात यावी. वाचवता येणारी दुकाने किंवा त्यांच्या पुढचा काही भाग हटवायचा असेल तर आम्ही हटवायला तयार आहोत. मात्र नगर पंचायतीचे अधिकारी जनतेला बेरोजगार बनविण्याचे काम करत आहेत. सध्या दुकानदारांना ,शुक्रवारपर्यंत दुकाने रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. सोमवार किंवा मंगळवार पासून दुकानांवर गजराज चालवण्याचा इशारा नगर पंचायतीने दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!