Join WhatsApp group

Ads

२४ तासांत दुचाकी चोरीचा छडा; आरोपी अटकेत

By Sarkarmzanews

November 11, 2026 1:38 pm

Ads

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच आरोपीकडून आणखी एक विनानंबर प्लेटची ॲक्टिव्हा, अशी दोन वाहने जप्त करण्यात आली.

राजराजेश्वर मंदिराजवळ राहणारे अभिषेक रविंद्र रुईकर (३६) यांनी आपली हिरो होंडा फॅशन प्लस मोटारसायकल (क्र. एमएच ३० आर ८११०) ८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घराशेजारील राजराजेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, काही वेळाने मोटारसायकल जागेवर दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला. मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अंकुश राजू कांबळे (२२, रा. कामगार कल्याण, डाबकी रोड, अकोला) याला ताब्यात घेतले. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.२८ वाजता त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल आणि पांढऱ्या रंगाची विनानंबर प्लेटची जुनी ॲक्टिव्हा, अशी दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस अंमलदार शेख असलम, पंकज उपाध्याय, सागर शिरसाट, आशिष नांदोकार व शाम पोधाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!