Join WhatsApp group

Ads

राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

By Sarkarmzanews

November 4, 2026 8:01 pm

Ads

अकोट: पुणे विभागाच्या खेळाडूंचे स्पर्धेवर वर्चस्व राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२६ – २७ (१४ वर्षे व १९ वर्षे वयोगट मुले व मुली) दिनांक २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान संत गजानन महाराज सजल विहीर संस्थान अकोली आकोलखेड पोपटखेड रोड तालुका आकोट येथे खेळाडूंच्या पदक वितरण कार्यक्रमासह संपन्न झाल्या.

आकोट चे आमदार मा. प्रकाश भारसाकळे यांच्या भरीव सहकार्याने तसेच जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना अध्यक्ष आयोजन समिती तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सतिषचंद्र भट जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या नेतृत्वाखाली सदर स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

निसर्गरम्य परिसर, निवास व भोजनाची चांगली व्यवस्था, खेळाचे अद्यावत मैदान व निष्पक्ष आणि तज्ञ तांत्रिक सामनाधिकारी व पंच मंडळ या सर्व गोष्टींमुळे सदर स्पर्धेच्या नियोजन आयोजनाची महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेल्या खेळाडूंनी व प्रशिक्षक यांनी भरभरुन तारीफ केली.

सदर स्पर्धेत मुले व मुली विभागात वयोगट व वजन गटानुसार एकुण ४२ गटातून स्पर्धा संपन्न झाल्या. प्रत्येक वजन गटात महाराष्ट्रातील आठ विभागांचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू सहभागी झाले होते.

त्यातून प्रत्येक गटात १ सुवर्ण, १ रजत व २ कांस्य पदक विजेते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित गजानन महाराज सजल विहीर संस्थान चे विश्वस्त धर्मे, स्पर्धा निरीक्षक प्रविण बोरसे, तांत्रिक समिती प्रमुख सुरेश चौधरी, जिल्हा प्रमुख शिवाजीराव चव्हाण आदी मान्यवरांचे हस्ते खेळाडूंना पदकांचे वाटप करण्यात आले.

पुणे विभागाचे खेळाडूंनी आपल्या कौशल्याने स्पर्धेत सर्वाधिक पदकांवर कब्जा करून स्पर्धेत प्रथम क्रमांक – ओव्हरऑल चाम्पियनशिप मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आकोट परिसरातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य तसेच जंगल सफारी ची संधी वन विभाग आकोट द्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. सहभागी खेळाडूंना तसेच पंच व प्रशिक्षकांना स्पर्धेची आठवण म्हणुन वन विभाग आकोट द्वारे प्रायोजित किचेन देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आकोट तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे व सचिव निलेश झाडे यांच्या नेतृत्वात आकोट च्या शारीरिक शिक्षकांनी स्पर्धा सहाय्यकाची चोख भुमिका पार पाडली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला चे क्रीडा अधिकारी व राज्य क्रीडा मार्गदर्शक चारुदत्त नाकट, अभिजित फिरके, मनिषा ठाकरे, निलिमा जाधव, राजेंद्र गावंडे, विजय डोबाळे, सुरजकुमार दुबे, यांचे सह निशांत वानखडे, श्रीकृष्ण वायकर, लक्ष्मीकांत उगवेकर, गजानन चाटसे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Article

मुख्यमंत्र्यांचा तोतया ओएसडी! ३.२५ कोटींची मंत्रालयीन लूट? ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मालक रणजितसिंह ओबेरॉय यांची फसवणूक

मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले अनुदान? पाठपुराव्यानंतर तीन तासांत लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा

विरोधक बनणार होते; मित्रपक्षच मजबूत झाला!मूर्तिजापूरच्या राजकारणात ‘भगवा’ समीकरणाचा नवा डाव; पाच नगरसेवक शिवसेनेत

बार्शीटाकळीत ३५ टन संशयित तांदळाला ‘बिलांचे कवच’?चार दिवसांनी गुन्ह्याची प्रक्रिया; आता कागदपत्रांची सत्यता तपासणार कोण?

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!