Join WhatsApp group

Ads

मुख्यमंत्र्यांचा तोतया ओएसडी! ३.२५ कोटींची मंत्रालयीन लूट? ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मालक रणजितसिंह ओबेरॉय यांची फसवणूक

By Sarkarmzanews

November 4, 2026 11:10 am

Ads

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याची बतावणी करून अकोल्यातील बांधकाम कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची ५० कोटी रुपयांची प्रलंबित बिले मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण (४०) याला अटक केली आहे.
अकोला येथील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजितसिंह ओबेरॉय यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सुमारे ५० कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती. ही बिले मंजूर करून देण्याची क्षमता असल्याचे भासवत पठाण याने त्यांच्याशी संपर्क साधला.

आपण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असून मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित असल्याची बतावणी त्याने केली. एवढेच नव्हे, तर प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी मदत करू शकणाऱ्या आणखी एका व्यक्तीशीही त्याने ओबेरॉय यांची ओळख करून दिली.


या आश्वासनांवर विश्वास ठेवून ओबेरॉय यांनी पैशांची व्यवस्था केली. १० सप्टेंबर रोजी ते मुंबईत आले असता आरोपीच्या एका साथीदाराकडे त्यांनी सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी पठाण याने आणखी दोन कोटी रुपयांची मागणी केली. अशा प्रकारे एकूण ३ कोटी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपीची पैशांची मागणी थांबली नाही. त्याने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास यापूर्वी दिलेले पैसेही बुडतील आणि प्रलंबित बिले मंजूर होणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ओबेरॉय यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान आसिफ पठाण याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचा साथीदार कोण, त्याच्याकडे दिलेली सव्वा कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली आणि या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.


दरम्यान, शासकीय विभागातील प्रलंबित बिले मंजूर करून देण्याच्या नावाखाली वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पदांचा प्रभाव वापरल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून कंत्राटदारांनी सावध राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

न्यूज फोटो – AI GENRATED

Related Article

मुख्यमंत्र्यांचा तोतया ओएसडी! ३.२५ कोटींची मंत्रालयीन लूट? ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मालक रणजितसिंह ओबेरॉय यांची फसवणूक

मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले अनुदान? पाठपुराव्यानंतर तीन तासांत लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा

विरोधक बनणार होते; मित्रपक्षच मजबूत झाला!मूर्तिजापूरच्या राजकारणात ‘भगवा’ समीकरणाचा नवा डाव; पाच नगरसेवक शिवसेनेत

बार्शीटाकळीत ३५ टन संशयित तांदळाला ‘बिलांचे कवच’?चार दिवसांनी गुन्ह्याची प्रक्रिया; आता कागदपत्रांची सत्यता तपासणार कोण?

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!