Join WhatsApp group

Ads

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

By Sarkarmzanews

October 31, 2026 10:12 am

Ads

अकोला : दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाने अकोला जिल्ह्यात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आपला ‘क्वालिटी वॉच’ अधिक तीव्र केला आहे. २५ ते ३० ऑक्टोबर या अवघ्या सहा दिवसांत तेल, मसाला आणि गुळाच्या व्यवसायांवर सलग कारवाया करण्यात आल्या.

या कारवायांमध्ये सोयाबीन, मोहरी व तीळ तेलाचे नमुने घेण्यापासून मसाला आणि गुळाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी भेसळीच्या संशयावरून हजारो किलो अन्नसाठा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे FDAची नजर केवळ भेसळीच्या संशयावर थांबलेली नाही. लेबलवर केलेले दावे, घटकांची माहिती, खाद्यपदार्थांची साठवणूक, FIFO अभिलेख, स्वच्छता, स्टॉक रजिस्टर, पेस्ट कंट्रोल, FSMS प्लॅन आणि खाद्यपदार्थ जमिनीवर ठेवले आहेत का? यासारख्या बाबीही तपासल्या जात आहेत.

मारवाडी ट्रेडर्सच्या प्रकरणात ‘Pure Natural Jaggery’ या दाव्याची नोंद घेत १२,१५० किलो गुळाचा साठा, तर जय भोले किराणा शॉप येथे ३,६०० किलो सोयाबीन तेलाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. गलानी ॲग्रो येथेही १,११० किलो मोहरी व तीळ तेलाचा साठा कारवाईत आला.

या सलग कारवायांकडे केवळ ‘जप्ती’ म्हणून पाहण्यापेक्षा अन्न व्यवसायातील नियमपालन तपासण्याची पद्धत अधिक व्यापक होत असल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सह आयुक्त एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली.

दिवाळीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, मसाले, मिठाई आणि गूळ खरेदी करतात. त्यामुळे या काळातील FDAची सक्रियता ही केवळ व्यापाऱ्यांसाठी तपासणी नसून थेट ग्राहकांच्या आरोग्याशी जोडलेली सुरक्षा यंत्रणा आहे.

आता प्रश्न एवढाच—दिवाळीचा बाजार वाढतोय, तशी FDAची नजरही किती दूरपर्यंत पोहोचते?

Related Article

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

उपोषण सुरू होताच ‘विना आमंत्रित’ नेत्यांची एन्ट्री! आजकल चर्चेचा विषय

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

🚨 मोठी बातमी | सरकार माझा न्यूज वरप्रमाणपत्राचा ‘खेळ’ पडणार उघड?नोंदीत तफावत, रक्तनात्याचे पुरावे मागवले; चौकशीवर दबावाच्या चर्चेने खळबळ!

मटक्यावर कारवाई, बुकींचे काय?एकावर गुन्हा; शहरातील कथित मटका नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!