Join WhatsApp group

Ads

उपोषण सुरू होताच ‘विना आमंत्रित’ नेत्यांची एन्ट्री! आजकल चर्चेचा विषय

By Sarkarmzanews

October 27, 2026 5:30 pm

Ads

मुर्तीजापूर : शहरात सध्या विविध प्रश्नांवर उपोषण आणि आंदोलने होत आहेत. मात्र एखादे आंदोलन सुरू झाले की त्याठिकाणी काही ‘स्वयंघोषित’ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘स्वयंघोषित’ नेते विना आमंत्रित हजेरी लावत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आंदोलनकर्त्यांचा प्रश्न कोणता, त्यांची भूमिका काय, यापेक्षा माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया कशी देता येईल, याकडेच काहींचे अधिक लक्ष असल्याची उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

एखाद्या नागरिकाने किंवा महिलांनी आपल्या प्रश्नासाठी उपोषण सुरू करायचे आणि काहींनी अचानक घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या नावाखाली माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यायची, हा प्रकार आता मुर्तीजापुरात नवा राहिलेला नाही. विशेष म्हणजे संबंधित आंदोलनकर्त्यांनी बोलावले नसतानाही काही चेहरे आंदोलनस्थळी आवर्जून दिसतात.

प्रश्न जनतेचा, प्रतिक्रिया मात्र स्वतःची!

सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र दुसऱ्याच्या आंदोलनाचा मुद्दा स्वतःच्या राजकीय किंवा सामाजिक ओळखीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी वापरला जात असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.काही ठिकाणी आंदोलनकर्ते उपोषणाला बसलेले असताना माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणारे चेहरे मात्र वेगळेच असतात. त्यामुळे उपोषण करणारे कोण आणि आंदोलनाची ‘बाईट’ देणारे कोण, असा मिश्कील सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रेडिमेड मुद्दे आणि राजकीय पोळी

शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना त्यावर सातत्याने आवाज उठविणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. मात्र एखादा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आला की त्याच मुद्द्यावर अचानक काहींची सक्रियता वाढते.

मुद्दा तयार, आंदोलन तयार आणि प्रतिक्रिया देण्यासाठी ‘स्वयंघोषित’ नेतृत्वही तयार, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची चर्चा आहे.

जनतेच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे नाही. मात्र जनतेच्या अडचणींचे श्रेय घेण्यासाठी राजकारण होऊ लागले, तर त्याचा हिशेब जनता नक्कीच ठेवते.

‘सामाजिक कार्यकर्ता’ ही पदवी जनतेने द्यायची असते

स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणणे सोपे आहे; मात्र सामाजिक कार्य सिद्ध करण्यासाठी सातत्याने जनतेमध्ये काम करावे लागते. त्याचप्रमाणे नेता असल्याचे सांगणे वेगळे आणि जनतेने नेता म्हणून स्वीकारणे वेगळे.

माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणे, निवेदन देणे आणि आंदोलनस्थळी छायाचित्र काढणे यापेक्षा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हेच खऱ्या सामाजिक कार्याचे मापदंड ठरू शकते.

मुर्तीजापूरकर आता केवळ कॅमेऱ्यासमोर दिसणारे चेहरे पाहणार नाहीत. कोण आंदोलनाच्या वेळी दिसते आणि कोण प्रश्न सुटेपर्यंत दिसते, याची नोंदही घेतली जाईल.

शेवटी प्रश्न साधा आहे—

उपोषण जनतेचे असेल तर त्याचे नेतृत्वही जनतेचेच राहू द्या; ‘विना आमंत्रित’ येऊन श्रेय घेण्याची घाई कशासाठी?

कारण राजकारणात माईक मिळवणे सोपे असते;पण जनतेचा विश्वास मिळवणे अजूनही तितकेच कठीण आहे.

News photo – AI GENRATED PHOTO

Related Article

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

🚨 मोठी बातमी | सरकार माझा न्यूज वरप्रमाणपत्राचा ‘खेळ’ पडणार उघड?नोंदीत तफावत, रक्तनात्याचे पुरावे मागवले; चौकशीवर दबावाच्या चर्चेने खळबळ!

मटक्यावर कारवाई, बुकींचे काय?एकावर गुन्हा; शहरातील कथित मटका नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे का?

चंद्राकडे पाहत दूध पिणार, पण दुधाकडे कोण पाहणार?

मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अकोल्यात दोन आस्थापनांवर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

खाणमालकच खाणमालकांच्या विरोधात? पडद्यामागे नेमकी ‘भानगड’ काय?सहा मीटरचा नियम, ३० मीटर उत्खननाचा दावा अन् ब्लास्टिंगचा मुद्दा; कोण कोणाला लक्ष्य करत आहेत?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!