Join WhatsApp group

Ads

-

मटक्यावर कारवाई, बुकींचे काय?एकावर गुन्हा; शहरातील कथित मटका नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे का?

By Sarkarmzanews

October 25, 2026 9:59 pm

Ads

मुर्तिजापूर : शुक्रवार बाजारातील सैलानी बाबा दर्ग्याजवळ वरली मटक्याच्या चिठ्ठ्यांसह एका व्यक्तीवर मुर्तिजापूर शहर पोलिसांनी कारवाई केली. २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईत तीन चिठ्ठ्या, पेन व ५४५ रुपये जप्त करण्यात आले.

याप्रकरणी गुन्हा क्र. ७१९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, एकावर कारवाई करून शहरातील मटका थांबणार का?

शहरात मोबाईल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कथितरीत्या आकड्यांची देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चांमुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.डीबी पथकाकडे अशा व्यवहारांची माहिती आहे का? असल्यास कारवाई का नाही?

स्थानिक पातळीवरील सुरू असलेल्या अवैध्य धंद्यानची माहिती ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचते का?

एका चिठ्ठीवर कारवाई झाली, आता त्या चिठ्ठीमागची कथित साखळी पोलिस शोधणार का? याकडे मुर्तिजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

न्यूज फोटो – AI GENRATED

Related Article

चंद्राकडे पाहत दूध पिणार, पण दुधाकडे कोण पाहणार?

मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अकोल्यात दोन आस्थापनांवर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

खाणमालकच खाणमालकांच्या विरोधात? पडद्यामागे नेमकी ‘भानगड’ काय?सहा मीटरचा नियम, ३० मीटर उत्खननाचा दावा अन् ब्लास्टिंगचा मुद्दा; कोण कोणाला लक्ष्य करत आहेत?

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!