Join WhatsApp group

Ads

-

मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले अनुदान? पाठपुराव्यानंतर तीन तासांत लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा

By Sarkarmzanews

November 3, 2026 10:30 am

Ads

मूर्तिजापूर : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन अनुदान योजनेत एका लाभार्थी महिलेला तब्बल सात-आठ महिने अनुदानासाठी कार्यालयीन चकरा माराव्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

छाया संजीवन वानखडे यांनी झेरॉक्स मशीन खरेदी करून त्याचे जीएसटी बिलासह आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती, मूर्तिजापूर येथे सादर केली होती. मात्र, त्यांना सात-आठ महिन्यांपासून अनुदान मिळाले नव्हते. संबंधितांकडून “तुमचे अनुदान मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले आहे,” असे सांगितले जात असल्याचा दावा वानखडे यांनी केला.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते/वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी छाया वानखडे यांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी, पंचायत समिती मूर्तिजापूर यांची भेट घेतली. यावेळी लाभार्थीला तातडीने अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, संबंधित व्यक्तीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत कार्यालयात डिझेल आणल्याचे सांगितले. त्यानंतर अवघ्या तीन तासांत छाया वानखडे यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाल्याचा दावा करण्यात आला.यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून ₹१५ हजार रुपये घेतल्याचा/दिल्याचा उल्लेखही करण्यात आला असून, या बाबीची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.या वेळी संजय नाईक, माजी तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रंजित सिरसाट, विलास गुल्हाने, महेंद्र तायडे, नाना गावंडे, अजय वानखडे आदी उपस्थित होते. लाभार्थी छाया संजीवन वानखडे यांनी पाठपुरावा करणाऱ्यांचे आभार मानले.

जर अनुदान खरोखरच चुकीच्या खात्यात गेले होते, तर ते खाते कोणाचे होते? लाभार्थ्याच्या नावाने मंजूर झालेली रक्कम मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात कशी पोहोचली? आणि सात-आठ महिने प्रकरण प्रलंबित असताना आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अवघ्या तीन तासांत पैसे कसे जमा झाले?या प्रश्नांची समाजकल्याण विभाग आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अधिकृत उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

Related Article

विरोधक बनणार होते; मित्रपक्षच मजबूत झाला!मूर्तिजापूरच्या राजकारणात ‘भगवा’ समीकरणाचा नवा डाव; पाच नगरसेवक शिवसेनेत

बार्शीटाकळीत ३५ टन संशयित तांदळाला ‘बिलांचे कवच’?चार दिवसांनी गुन्ह्याची प्रक्रिया; आता कागदपत्रांची सत्यता तपासणार कोण?

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

उपोषण सुरू होताच ‘विना आमंत्रित’ नेत्यांची एन्ट्री! आजकल चर्चेचा विषय

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!