Join WhatsApp group

Ads

पोलीस उपनिरीक्षक कु निकीता गणेशराव अंबुसकर हिचा अकोले करांच्यावतीने जंगी सत्कार…

By Sarkarmzanews

December 25, 2024 2:59 pm

Ads

अकोला : दिनांक २५ : नाभिक समाजाचे प्रतिष्ठित नागरिकदेवी खदान अकोला येथील गणेशराव अंबुसकर यांची कन्या कु निकीता हिने नुकतेच पिएसआय बॅच १२४ नाशिक येथुन प्रशिक्षण पुर्ण करुन अकोला नगरी मध्ये प्रथम आगमन प्रसंगी तिचे अकोले करांचा स्वाभिमान म्हणून श्री विनोद अंबुसकर मित्र परिवार यांनी स्वराज भवन अकोला येथे कु निकीताचा जंगी सत्कार करण्याचे आयोजन केले होते.

त्यावेळी अकोला जिल्हा महिला कॉग्रेसच्या जिल्लाध्यक्षा सौं.पुजा ताई काळे, बार्शिटाकळी नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्रावण भातखडे, जेष्ठ समाजसेवक नंदुभाऊ बोपुलकर, (सेवानिवृत्त अभियंता पाटबंधारे विभाग) नारायणराव कळमकर, भारिप बहुजन महासंघाचे माजी महासचिव दीपकजी गवई , एडवोकेट आनंद गुढईकर , जय वाटुरकर , नरेंद्रजी लोळे , भूषण अंबुसकर , , श्री मोकळकर साहेब, विनोद अंबुसकर,मुक्याध्यापक श्री नरेंद्रजी ईगळकर, गजानन वाघमारे, अनिल शिंदे, , दिनेश श्रीवास, शिवलाल माझोडकर, सेवानिवृत्त ग्रामसेवक अंबुसकर साहेब, आदी मान्यवर व समाज बांधव व महिलामोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र ईगळकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद अंबुसकर यांनी केले

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!