Join WhatsApp group

Ads

-

अकोल्यात खळबळ! भररस्त्यात याकूब पहलवान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला; उपचार दरम्यान मृत्यू

By Sarkar Maza

June 30, 2026 5:44 pm

Ads

अकोला शहरात आज खळबळ उडवून देणारी घटना घडली. शहरातील रेल्वे स्थानक ते अग्रसेन चौक मार्गावर याकूब पहलवान यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या याकूब पहलवान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फरार झालेल्या संशयिताचा पाठलाग करून त्याला अल्पावधीतच ताब्यात घेतले.

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

भररस्त्यात घडलेल्या या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!