Join WhatsApp group

Ads

सरस्वती कोचिंग क्लासेस ची सेट्स परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार.

By Sarkarmzanews

December 19, 2024 9:42 pm

Ads

अकोला:- रविवारी १५ डिसेंबर रोजी सरस्वती कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभाचे कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रम मध्ये सरस्वती कोचिंग क्लासेसची सेट्स परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

०१ डिसेंबर रोजी स्थानिक तोष्णीवाल लेआउट टेलिफोन एक्सचेंज जवळ स्थित सरस्वती कोचिंग क्लासेस येथे अकरावी, बारावी, जेईई ,नीट, एमएचटी-सीईटी, पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या करिता विद्यार्थ्यांसाठी सेट्स परीक्षा मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. आणि यामधील शेकडो विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आहेत अशा विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले.

या सत्कार समारंभ मध्ये तज्ञ मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांबद्दल मार्गदर्शन तर केलेच आणि त्यासाठी लागणारी तयारी कशी असावी जेणेकरून सदर परीक्षा पहिल्याच प्रयत्ना मध्ये उत्तीर्ण करता येईल याचे मूलमंत्र दिले. सदर कार्यक्रमांमध्ये पश्चिम विदर्भातील म्हणजेच अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत पालकांची ही मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

नीट, जेईई, एमएचटी- सीइटीची स्वतंत्र नवीन बॅच ०२ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे याकरिता विद्यार्थ्यांनी ०१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!